बळीराजा कृषि विज्ञान मंडळ, लोळदगांव ता. जि. बीड ही संस्था सन 2005-06 पासून सेंद्रिय शेती मध्ये काम करत आहे. सेंद्रिय शेती योजना 2013-14 व 2014-15 अभियानांतर्गत सेंद्रिय शेती शेतकरी गटनिर्मिती, प्रशिक्षण, शेतकरी अभ्यास दौरे, मार्गदर्शन मेळावे अशा विविध प्रकारे सेंद्रिय शेती बाबत मोठी जागृती निर्माण केली आहे. रासायनिक खताचे, किटक नाशकाचे, निसर्गावर तसेच मानवी जिवनावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता सेंद्रिय खताची व बायोडायनॉमिक खताची निर्मिती व वापर वाढविणे गरजेचे आहे. संस्थेने गेल्या 19 वर्षात गांडूळ खत निर्मिती, बायोडानॅमिक कंपोस्ट खत निर्मिती, हिरवळीचे खत, जिवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, निंबोळी पावडर, सी.पी.पी. निर्मिती, उकिर्डा कंपोस्ट खत निर्मितीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिले आहे. बळीराजा कृषी विज्ञान मंडळ लोळदगाव ही संस्था महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या सेंद्रिय शेती धोरण या समितीमध्ये कार्यरत आहे.
महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे मान्यतेने सेंद्रिय शेती धोरणा अंतर्गत बळीराजा कृषी विज्ञान मंडळ, लोळदगाव संचलित, सेंद्रिय शेतकरी प्रशिक्षण केंद्र लोळदगाव ता. जि. बीड येथे चालु आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये एकावेळी 100 प्रशिक्षणार्थीची प्रशिक्षणासाठी निवासी सोय आहे.
तसेच कृषी मंत्री बाळासाहेब थोरात आणि कृषिमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, कृषि आयुक्त उमाकांत दांगट, कृषि अधिकारी, पदाधिकारी व हजारो शेतकऱ्यांनी या संस्थेच्या सेंद्रिय शेती प्रकल्पाला आवर्जुन स्वखुशीने भेटी दिलेल्या आहेत व संस्थेच्या सेंद्रिय शेती प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या आणि आज संपूर्ण मराठवाड्यात तसेच महाराष्ट्रात 24 जिल्ह्यात बळीराजा कृषि विज्ञान मंडळ, लोळदगाव ही संस्था नैसर्गिक / सेंद्रिय शेतीत काम करत आहे.
संस्थेने 1200 गांडूळ हौदांची निर्मिती केली असून 16000 टन, खतांची निर्मिती वर्षाकाठी या हौदाव्दारे होत आहे. बायोडायनॉमिक कंपोस्ट खत निर्मितीचे 90000 हजार डेपो महाराष्ट्रात निर्माण केले. त्याव्दारे 2,20,000 टन खताची निर्मिती शेतकऱ्यांनी केली आहे. संस्थेने केलेल्या सेंद्रिय खतांच्या प्रचार, प्रसारामुळे 6,00,000 शेतकऱ्यांपर्यंत प्रसार, माध्यम, दुरदर्शन, आकाशवाणीच्या माध्यमातून नैसर्गिक / सेंद्रिय शेतीचे संदेश पोहचविले आहे. पैकी 150000- 200000 शेतकऱ्यांनी नैसर्गिक / सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली आहे. संस्थेने केलेल्या कामामुळे महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यामध्ये संस्थेला जाता आले व त्या गावातील शेतकऱ्यांचा नैसर्गिक / सेंद्रिय शेतीकडे कल वाढतो आहे.
तसेच नैसर्गिक / सेंद्रिय शेतीमध्ये काम करण्यासाठी संस्थेकडे 30 कृषि डिप्लोमा व कृषि पदवीधर यांचा स्टाफ आहे व भविष्यात नैसर्गिक / सेंद्रिय शेतीचे काम करण्यासाठी महाराष्ट्रात 1000 कृषि पदवीधारकांच्या जागा भरविण्याचे नियोजन आहे. जेणे करुन नैसर्गिक / सेंद्रिय शेतीचा प्रसार, प्रचार व चळवळ मोठ्या प्रमाणात वाढवण्यास मदत होईल. शेती व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत आहेत.