ड्रम क्र. ३ जीवाणू/पोल्ट्री स्लरी मातीमध्ये असणारी अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध अवस्थेत आणून देण्याचे महत्वाचे काम विविध प्रकारचे सुक्ष्मजीव करत असतात. याच उपयुक्त सुक्ष्मजीवांची संख्या जमिनीमध्ये वाढवली तर जास्तीत जास्त अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतील व पिकांचे संपूर्ण पोषण होईल. जिवाणू स्लरीच्या साह्याने आपण उपयुक्त सुक्ष्म जीवांची संख्या जमिनीत वाढवता येते व पिकांची अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवता येते. साहित्य : ५०० लिटरचा प्लॅस्टिक ड्रम, अॅझोटोबॅक्टर ६२५ ग्रॅम, पी.एस.बी. ६२५ ग्रॅम, केएमबी ६२५ ग्रॅम, सुक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करुन देणारे जीवाणू ६२५ ग्रॅम, ट्रायकोडर्मा ६२५ ग्रॅम, मायकोरायझा १२५ ग्रॅम, इ. एम. २ द्रावण २५ लिटर, ताक ५ लिटर, गुळ ५ किलो, पाणी, शेण २५ किलो किंवा अंड्यावरील कोंबडी खत १०० किलो, ५ किलो कडधान्य पीठ, गोमुत्र १२.५ लिटर, कोरफड लगदा ५ किलो, साडी किंवा धोतर. कृती :- प्रथमतः ५०० लिटर चा ड्रम स्वच्छ करावा त्यामध्ये ४५० लिटर पाणी टाकावे त्यात १२.५ लिटर गोमुत्र टाकावे. जुनी साडी किंवा धोतरामध्ये १० किलो शेण किंवा अंड्यावरील कोंबडी खत २० किलो. (पोल्ट्री स्लरीसाठी), ५ किलो कडधान्य पीठ व ५ किलो कोरफड, ५ किलो गुळ एकत्र मिसळून घ्यावा व त्याचे गाठोडे बांधावे. हे गाठोडे बांधलेली काठी सकाळी व संध्याकाळी २ ते ३ वेळा हलवावी. चार दिवसात या गाठोड्यातील अर्क पाण्यात उतरतो. यामुळे स्लरी पुन्हा गाळावी लागत नाही. या नंतर या द्रावणात अॅझोटोबॅक्टर ६२५ ग्रॅम पीएसबी ६२५ ग्रॅम केएमबी ६२५ ग्रॅम उपलब्ध करुन देणारे जीवाणू ६२५ ग्रॅम ट्रायकोडरमा ६२५ ग्रॅम टाकावे. हे द्रावण दिवसातून ३ ते ४ वेळा काठीने ढवळावे किंवा बुईंग करावे. ३ दिवसात हे द्रावण वापरण्यायोग्य होते. यामध्ये वापरण्यापूर्वी इ एम २ द्रावण ५ लिटर व मायकोरायझा २५ ग्रॅम टाकून लगेच पूर्ण द्रावण एकरी वापरावे हे द्रावण सावलीमध्ये तयार करावे व गोणपाट किंवा झाकणाने झाकून ठेवावे. विरजण म्हणून हे द्रावण वापरु नये. जीवाणू स्लरीचे फायदे :- १) जमिनीतील उपयुक्त सुक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते. २) माती भुसभुसीत होते. ३) पिकांच्या पांढऱ्या मुळांचे प्रमाण वाढते. ४) अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. ५) पिकांमधील आंतरीक रोगप्रतिकार शक्ती वाढते. जीवाणू स्लरी कोणत्या पिकांसाठी केव्हा व किती वापरावी ? जीवाणू स्लरी ऊस, कापूस, सोयाबीन, द्रांक्ष, केळी, डाळींब, फळफाज्या या पिकांमध्ये सर्व वाढीच्या आवस्थांमध्ये वापरता येते. पिक वाढीच्या प्रत्येक आवस्थेत, पिकाची वाढीची अवस्था, फुले येण्याची आवस्था, फळ निर्मितीची आवस्था, फळ पक्वतेच्या आवस्थेत वापरावी. पाण्यातून सोडावी, जिवाणू स्लरीचे द्रावण विरजन म्हणून वापरु नये. प्रमाणः- प्रत्येक वाढीच्या आवस्थेत एकरी २०० लिटर जिवाणू स्लरी पाटपाणी किंवा ठिबकद्वारे