ड्रम क्र.५ सप्त धान्य स्लरी विविध प्रकारच्या तृणधाण्यामध्ये प्रथिने, कार्बोदके, जिवनसत्वे त्याच बरोबर खनिजेही विपुल प्रमाणात असतात. इ.एम. द्रावणाच्या साह्याने या धान्याची उत्कृष्ठ स्लरी बनवता येते. साहित्य : बाजरी ६२५ ग्रॅम, ज्वारी ६२५ ग्रॅम, मका ६२५ ग्रॅम, नाचणी ६२५ ग्रॅम, वरई ६२५ ग्रॅम, सोयाबीन ६२५ ग्रॅम, उडीद ६२५ ग्रॅम, या धान्यांचा भरडा + इ.एम. द्रावण १०० लिटर गोमुत्र २५ लिटर + गुळ ५ किलो + पाणी ३५० लिटर हे द्रावण दिवसातून ३ वेळा ढवळावे किंवा ब्लोअरच्या साह्याने एक तास सकाळ दुपार संध्याकाळ हवा द्यावी. ५ दिवसानी हे द्रावण वापरण्यासाठी तयार होते. ऊस, केळी, द्राक्ष, डाळींब, फळफाज्या इत्यादीसाठी १०० लिटर सप्तधान्य स्लरी एकरी पाटपाण्याने किंवा ड्रिपमधुन गाळुन सोडावी. पिकाच्या वाढीच्या व फुले येण्याच्या अवस्थेत हि स्लरी दिल्यास फायदेशीर असते. जमिनीसाठीचे ड्रम कसे वापरावे ? :- पिकाला ठिबक सिंचनाद्वारे किंवा पाटपाण्यातून वरील सर्व निविष्टा देता येतात. "एक एकर क्षेत्रासाठी १०० लिटरच्या बॅरल मध्ये खाली दिलेल्या प्रमाणानुसार द्रावणे घ्यावीत, घेतलेल्या द्रावणामध्ये पाणी मिसळून १०० लिटर करावे व व्हेन्चुरी लावुन किंवा पाटण्यातुन एकरी द्रावण सोडावे. १) ह्युमिक अॅसीड द्रावण ५ लिटर किंवा फूल्वीक अॅसीड द्रावण ५ लिटर २) जीवाणू स्लरी ५० ते १०० लिटर किंवा इ.एम. २ द्रावण ५ ते १० लिटर वरील तीन प्रकारची द्रावणे एकत्र मिसळून देता येतात. पिकाच्या प्रत्येक पाण्याला जमिनीसाठीच्या द्रावणाचा ड्रम योग्य प्रमाणात घेऊन सोडावा. फायदे :- १) या मुळे मुख्य अन्नद्रव्यांबरोबर सुक्ष्म अन्नद्रव्याचीही उपलब्धता होते. २) या सल्रीचा वारंवार वापर केल्यास जमिनीतील उपयुक्त सुक्ष्म जिवांचे प्रमाण वाढते. ३) पिकांच्या पांढऱ्या मुळांची संख्या वाढते.