ड्रम क्र. ४ डिकंम्पोजर द्रावण या कल्चरमध्ये विविध अन्नद्रव्ये उपलब्ध करुन देणारे सुक्ष्मजीव त्याच बरोबर पिकांवरील रोग व किडीला प्रतीकार करणारे सुक्ष्मजीव आहेत. या द्रावणातील विविध सुक्ष्मजीव व मायक्रोबीयल सेकंडरी मेटाबोलाईटस् उदा. पॉलीकेटाईड व अल्काईन तयार करतात. यामुळे झाडाची रोप्रतिकार शक्ती वाढते. त्याचबरोबर ग्लुकोनेज बी, १-३ ग्लुकानेज ही एन्झाईम्स तयार झाल्याने झाडामधील अंतरीम प्रतिकार क्षमता वाढते. डिकंम्पोजर द्रावणात स्फुरद विरघळवणारे जीवाणू व सुडोमोनस चे स्पेसीस च्या जीवाणूंचा समावेश असतो. या कल्चरमध्ये सेल्युलोज डिग्रेडींग बॅक्टेरीया व झायलम डिग्रेडींग बॅक्टेरीया असल्यामुळे सेंद्रिय पदार्थ कुजवण्याची क्षमता ही चांगली असते. साहित्य : डिकंम्पोजर कल्चर ५ ग्रॅम, गुळ ५ किलो, पाणी ५०० लिटर, ५०० लिटरचा ड्रम कृती :- ५०० लिटर ड्रममध्ये ५०० लिटर पाणी+५ किलो गुळ+२५ ग्रॅम डिकंम्पोजर कल्चर मिसळून घ्या. यामधील सुक्ष्मजीव हवेत वाढणारे असल्याने दिवसातून दोन ते तीन वेळा काठीने हालवा किंवा बुईंग करा. ४ ते ५ दिवसात द्रावणावर सायीसारखा तवंग येतो. द्रावणाचा पी.एच.५ पेक्षा कमी होतो. त्यानंतर याचा वापर करा. द्रावण १ वर्षभर वापरु शकता. पुन्हा तयार करण्यासाठी ५०० लिटर पाण्यासाठी १ किलो गुळ व ५ लिटर तयार केलेले डिकंम्पोजर द्रावण विरजणासारखे वापरता येते. डिकंम्पोजर द्रावणाचा वापर स्लरी, अर्क व चांगले सेंद्रिय खते तयार करणेसाठी प्रभावीपणे होते. फायदे :- १) सेंद्रिय पदार्थ कुजवण्यासाठी क्रिया जलद झाल्यामुळे या पासुन चांगल्या दर्जाचे सेंद्रिय खत तयार करता येते. २) जमिनीतील सुप्त अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी याचा वापर करता येतो. ३) क्षारयुक्त चोपन जमिनीची सुधारणा करणेसाठीही या द्रावणाचा वापर होतो. ४) बिज प्रक्रियेसाठी किंवा अंकुरण क्षमता वाढवण्यासाठी याचा वापर होतो. ५) स्लरी, अर्क करणेसाठीही याचा वापर होतो. ६) रोग, किड, नियंत्रण करणेसाठीही याचा वापर होतो. केव्हा वापरावे ? डिकंम्पोजर द्रावण सर्व पिकांसाठी सर्व आवस्थेत वापरता येते. वाढीची आवस्था, फुले येण्याची आवस्था, फळ पक्वतेची आवस्था, डिकंम्पोजर द्रावण एकरी १०० ते २०० लिटर पाण्यामध्ये किंवा ठिबक मधून द्यावे.