ड्रम क्र. ८ : इ.एम. आमिल अर्क इ.एम.आमिल अर्क हा आले, मिरची व लसून यांचा इ.एम. २ द्रावणाच्या साह्याने काढलेला अर्क आहे. साहित्य : ५०० लिटरचा एअर वॉल असलेला प्लास्टीक बॅरल (हवा बंद ड्रम), इ.एम. ५ लिटर, गुळ १० किलो, आले १० किलो, मिरची १० किलो, लसून २० किलो, ताक ५ लिटर, ग्राईडींग मशिन. कृती :- १) इ.एम. २ द्रावण तयार करणे. इ.एम. १ कल्चर ५ लिटर ४०० लिटर पाणी + गुळ १० किलो यांचे मिश्रण करुन एअर वॉल असलेल्या ड्रममध्ये ५ दिवस हवा बंद ठेवा. २) आले १० किलो, मिरची १० किलो, लसुन २० किलो, ग्रायडींग मशिनमध्ये टाकून लगदा (पेस्ट) तयार करा. ३) तयार झालेला लगदा इ. एम. २ द्रावण ४०० लिटर मध्ये टाका. ४) त्यामध्ये १० किलो गुळ व ५ लिटर ताक टाकून ड्रम हवाबंद करा. पुढील ६ दिवसात आमिल अर्क तयार होईल. हा अर्क गाळून फवारणीसाठी वापरावा. एक वर्ष हा अर्क प्रभावीपणे वापरता येतो. इ.एम. आमिल अर्काचे फायदे :- १) पिठ्या, ढेकूण किंवा मिलबग नियंत्रणासाठी द्रांक्ष, सिताफळ, फळभाज्या यामध्ये प्रभावीपणे वापर होतो. २) याचा वारंवार फवारणीमुळे पिकांमधील आंतरिक रोग व किड प्रतिकार शक्ती वाढते. ३) यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धताही वाढते. इ.एम. आमिल अर्काचा वापर :- इ.एम. आमिल अर्काचा वापर सर्व पिकामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, सिताफळ, पपई, संत्रा, वांगी, टोमॅटो इ. मध्ये पिठ्या ढेकूण नियंत्रणासाठी सर्व वाढीच्या आवस्थामध्ये फवारणीसाठी होतो. रोप आवस्था, वाढीची आवस्था, फुले येण्याची आवस्था, फळे तयार होण्याची आवस्था. फळ झाडामध्ये खोडे धुण्यासाठीही हा अर्क वापरतात. या अर्कासोबत उपयुक्त सुक्ष्मजीव इत्यादीचे मिश्रण करुन फवारता येते. फवारणी करताना इ.एम. आमिल अर्क ५ ते १० मिली प्रती १ लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी.