ड्रम क्र. १० : इ.एम. देशीकेल्प १० ड्रम थेअरीमध्ये जमिनीतील ५ ड्रम अन्नद्रव्ये पिकाला मिळण्यासाठी माती समृध्द करण्यासाठी आहेत. इ.एम. २ द्रावण एक चांगल्या प्रकारचे बुरशिनाशक आहे. इ.एम. दशपर्णी अर्क, इ.एम. वेमिल अर्क व इ.एम. अमिल अर्क किटकनाशके म्हणून वापरले जातात. याच बरोबर पिक उत्पादनात टॉनिक म्हणून इ. एम. देशीकेल्पचा वापर होतो. यामध्ये तयार होणारा अर्क जैव संप्रेरक म्हणून काम करतो. इ.एम. देशीकेल्पसाठी साहित्य : ५०० लिटरचा एअर वॉल असलेला हवा बंद प्लास्टीक ड्रम, इ.एम. १ कल्चर ५ लिटर, १० किलो गुळ, कोरफड ३५ किलो, मेथीघास ३५ किलो, शेवगापाने ३५ किलो, ग्राईडींग मशीन इ.एम. देशीकेल्प तयार करण्याची कृती :- १) प्रथम इ.एम. २ द्रावण तयार करणे. इ.एम. १ कल्चर ५ लिटर + ४०० लिटर पाणी + १० किलो गुळ यांचे मिश्रण करुन ५ दिवस हवा बंद ड्रम मध्ये ठेवा. इम.एम. २ द्रावण तयार होईल. २) कोरफड ३५ किलो, मेथीघास ३५ किलो, शेवगा पाने ३५ किलो ग्राईडींग मशिनचा वापर करुन लगदा (पेस्ट) तयार करावा. ड्रममध्ये ४०० लिटर इ.एम. २ द्रावण व पेस्ट टाकुन भरुन घ्यावे. ड्रम हवा बंद करावा. हा अर्क १० दिवसात तयार होतो. ३) हे द्रावण गाळून फवारणीसाठी वापरावे. १ वर्षांपर्यत याची साठवणूक करता येते व प्रभावीरित्या वापरता येते. इ.एम. देशीकेल्प मधुन फॉस्फरस, कॅल्शीयम, पोटॅशियम ही अन्नद्रव्ये मुबलक प्रमाणात मिळतात. याच बरोबर सिलीकॉन, सिलेनियम हे ट्रेस इलिमेट ही मिळतात. या मुळे हे एक प्रकारच्या टॉनिक प्रमाणे कार्य करते. इ.एम. देशीकेल्पचे फायदे :- १) याचा वापर केल्यामुळे मुख्य अन्नद्रव्ये व सुक्ष्म अन्नद्रव्ये विपुल प्रमाणात मिळतात. २) यामुळे फळांचा दर्जा सुधारतो, साठवण क्षमता वाढते. ३) इ.एम. देशीकेल्पच्या नियमित वापरामुळे पिकांमधील रोग व किडप्रतिकार क्षमता वाढते. ४) पिकांचे फुलांचे प्रमाण वाढते, फुळगळ थांबते.