ड्रम क्र.६ इ.एम. २ द्रावण जमिनीमध्ये असंख्य सुक्ष्म जीव असतात, हे सुक्ष्मजीव निसर्गचक्र सुरळीत ठेवण्याचे कार्य करतात, यातील काही हवेच्या सानिध्यात काम करतात तर काही हवे विरहीत ठिकाणी कार्यक्षम असतात. इ.एम. म्हणजे परिणामकारक उपयुक्त सुक्ष्मजीव जपानी शास्त्रज्ञ डॉ. टेरीओ हिगा याने या सुक्ष्मजीवांचा शोध लावला. त्याने इ.एम.ला ए.च. "is the God" असे संबोधले इ. एम. म्हणजे एक प्रकारचा देवदूत की जो अडचणीच्या वेळी व ठिकाणी धावून येतो. यामध्ये लॅक्टोबॅसीलस, सबस्टल्लिस, रुडोसुडोमोनस पाल्युटीस (फोटोसीथेटीक बॅक्टेरीया) व सॅकेरोमायसीस सीरव्हीसीस (ईस्ट) हे उपयुक्त सुक्ष्मजीव आढळतात. इ.एम. द्रावणामुळे ३०% सडवण्याची (Decomposition) व ७०% विघटणाची (Disintigration) क्रिया होते. यामुळे कोणत्याही घटकाबरोबर जैवरासायनिक अभिक्रिया झाल्यावर दुर्गंधी येत नाही. हे सर्व सुक्ष्मजीव हवे विरहीत ठिकाणी प्रभावीपणे काम करतात. इ.एम. वापर करुन विविध पाले, फळे, प्राणी, या घटकाचे लवकर व प्रभावीपणे अर्क काढता येतात. हे सुक्ष्मजीव १५ ते ३५ अंश सेल्सीअस तापमानात चांगल्या प्रकारे कार्य करतात. साहित्य : एअर वॉल लावलेल्या झाकणाचा ५०० लिटर चा ड्रम, ५ लिटर इ.एम., ६०० ग्रॅम गुळ, पाणी. कृती :- प्रथम ड्रम स्वच्छ धुवून घ्या. त्यामध्ये ४५० लिटर पाणी टाका त्यात ५ लिटर इ. एम. १० कल्चर ४ किलो गुळ टाकुन ड्रम हवा बंद होईल अशा पध्दतीने एअरवॉल असलेल्या झाकणाने बंद करा. ५ दिवसात इ.एम. २ द्रावण तयार होते. ड्रम कायम हवा बंदच ठेवा. हेच इ.एम. २ द्रावण विरजणासारखे पुढील द्रावण करणेसाठी वापरता येते. द्रावण तयार झाले की नाही हे पाहण्यासाठी खालील निरीक्षणे करा. द्रावणाच्या पृष्ठभागावर पांढरट सुक्ष्मजीवांचा थर जमा होतो. द्रावणाचा आंबट गोड वास येतो. द्रावणाचा पी.एच.४.५ पेक्षा कमी येतो. इ.एम. द्रावणाचे फायदे :- १) यामुळे जमिनीतील उपयुक्त सुक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते. २) मातीचा व पाण्याचा पी.एच. संतुलीत करण्यासाठी इ.एम. द्रावणाचा वापर होतो. ३) यामुळे क्षारपड, चोपन जमिनीची सुधारणाही होते. ४) माती भुसभुसीत होते. ५) पांढऱ्या मुळीची वाढ होते. ६) जमिनीतील अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. ७) पिकांमधील आंतरीक रोगप्रतिकार क्षमता वाढते. ८) वनस्पती व प्राणीजन्य अर्क काढण्यासाठी इ. एम. चा प्रभावीपणे वापर होतो. ९) गटारी स्वच्छ करणेसाठी त्याचबरोबर दुर्गंधी घालवण्यासाठी इ.एम. वापरता. १०) सेंद्रीय खते निर्मितीमध्येही याचा वापर होतो. ११) करपा व भुरीचे नियंत्रण ही यामुळे होते. अशा शेतकऱ्यांची निरीक्षणे आहेत. १२) याचा वापर केल्याने फळावरील चकाकी वाढते. फळांचा रंग बदल करणेसाठीही याचा वापर होतो. १३) विरजणाप्रमाणे पूढे द्रावण वाढवण्यासाठी १ वर्षापर्यंत याचा वापर होतो. १४) ठिबकचा संच स्वच्छ करणेसाठीही याचा वापर होतो. इ.एम. द्रावण केव्हा वापरावे ? तृणधान्य, कडधान्य, फळभाज्या, पालेभाज्या, द्रांक्ष, केळी, डाळींब, ऊस या सर्व पिकांमध्ये याचा वापर विकांच्या सर्व आवस्थामध्ये करता येतो. इ.एम. द्रावणाचा जमितीतून वापर इ. एम. २ द्रावण १० लिटर प्रती एकरी याप्रमाणे ठिबक मधून किंवा पाट पाण्याने सोडावे. इ.एम. द्रावणात अर्क केल्याचे फायदे :- १) ८ ते १० दिवसात अर्क तयार होतात. २) घराजवळ अर्क करु शकतो. याचा घान वास येत नाही. ३) पहिल्यांदाच पाने, फळे कुटून द्रावणात टाकावी लागतात, पुन्हा कोणतेच काम नसते. ४) इ. एम. पासून तयार केलेले अर्क गाळावे लागत नाहीत. ५) या पध्दतीत कोणतही इंधन लागत नाही. ६) अर्क तयार करत असलेल्या ठिकाणी मधमाश्यांच्या वावर वाढतो. ७) या पध्दतीने केलेल्या अर्काचे पिकांवर स्कॉरचिंग येत नाही. ८) वर्षभर हे अर्क आपण वापरु शकतो. ९) प्राणीजन्य अर्क उदा. कोंबडी, खेकडे, मासे यांचाही अर्क यामध्ये करता येतो. १०) यामुळे फवारणीच्या पाण्याचा पी.एच. संतूलित होतो. यामुळे फवारणी प्रभावी होण्यास मदत होते. ११) हे अर्क विषारी नसल्यामुळे प्राणी व माणसाला याचा कोणताही धोका नाही. व याची अॅलर्जी ही होत नाही.