ड्रम क्र. ९ : इ.एम. वेमिल अर्क
वेखंड, मिरची व लसुन यांचा अर्क इ.एम. च्या द्रावणाच्या साह्याने काढुन फवारणीसाठी वापरला जातो. रस शोषणाऱ्या किडीपासून प्रतीबंधनात्मक उपाय योजना म्हणून हा अर्क प्रभावीपणे काम करतो.
साहित्य :
५०० लिटरचा एअर वॉल असलेला हवा बंद प्लास्टीक ड्रम, वेंखड १० किलो, मिरची १० किलो, लसुन २० किलो, गुळ १० किलो, इ. एम. ५ लिटर, ताक १० लिटर
इ.एम. वेमिल अर्क तयार करण्याची कृती :-
१) प्रथम इ.एम. २ द्रावण तयार करणे. इ.एम. १ कल्चर ५ लिटर ३७५ लिटर पाणी + १० किलो गुळ ५०० लिटरच्या हवा बंद ड्रम मध्ये टाका. ५ दिवसात द्रावण तयार होईल.
२) वेखंड १० किलो, मिरची १० किलो, लसुन २० किलो, ग्रायडींग मशिन मध्ये टाकुन लगदा (पेस्ट) तयार करा. या लगद्यामध्ये ४०० लिटर इ.एम. २ द्रावण टाका.
३) ड्रम हवा बंद ठेवा. इ.एम. वेमिल अर्क पुढील ८ ते १० दिवसात तयार होईल. हा अर्क गाळून फवारणी साठी वापरा. एकदा तयार केलेला अर्क १ वर्ष साठवता
येतो व फवारणी वापरता येतो.
इ.एम. वेमिल अर्काचे फायदे :-
१) या अर्काचा उपयोग द्राक्ष, मिरची, टोमॅटो, भेंडी, डाळींब या पिकांमध्ये लाल कोळी नियंत्रणासाठी प्रभावीपणे होतो.
२) या अर्काची सातत्याने फवारणी केल्यास पिकामधिल रोग व किड प्रतिकार क्षमता वाढते.
३) अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते.
४) उपयुक्त सुक्ष्मजीवांबरोबर इ.एम. वेमिल अर्क वापरता येतो.
इ.एम. वेमिल अर्काचा वापर :-
इ.एम. वेमिल अर्क सर्व रस शोषणाच्या किडीच्या नियंत्रणासाठी वापरता येतो. प्रामुख्याने लाल कोळी नियंत्रणासाठी याचा वापर होतो. रोप आवस्था, वाढीची आवस्था, फुले येण्याची आवस्था, फळे तयार होण्याची आवस्था.
इ.एम. वेमिल अर्क ५ ते १० मिली प्रती १ लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी.