ड्रम क्र. २ फल्वीक अॅसीड द्रावण फल्वीक अॅसीड हा ही एक सेंद्रिय पदार्थ आहे. ह्युमिक अॅसीड वर विविध अम्लाची प्रक्रिया करुन फल्वीक अॅसीड तयार होते. ऑस्ट्रेलियाचे कृषिशास्त्रज्ञ डॉ. ग्रॅम सिट फल्वीक अॅसीडला सेंकड सन (दुसरा सुर्य) असे संबोधतात, कारण यामुळे प्रकाश संश्लेशनाचा वेग वाढतो. फल्वीक अॅसीड विविध खताचे चिलेशन (आस्तरीकरण) करणेसाठी वापरता येते. फल्वीक अॅसीड चॉकलेटी रंगाचे पावडर व द्रव स्वरुपात मिळते. फल्वीक अॅसीड द्रावण तयार करण्यासाठीचे साहित्य : ५०० लिटरचा प्लॅस्टिक ड्रम, ७.५ किलो फल्वीक अॅसीड, ५०० लिटर पाणी कृती :- ड्रम मध्ये ७.५ किलो फल्वीक अॅसीड ४५० लिटर पाणी मिसळून काठीने ढवळा लगेच द्रावण वापरण्यास योग्य होते. शक्यतो जितक्या द्रावणाची आवश्यकता आहे. तेवढेच द्रावण करुन लगेच वापरा. फल्वीक अॅसीड द्रावण हे प्रकाश संश्लेषन क्रिया जलद करण्यास मदत करते. फायदे :- १) यामुळे मातीचा सामू नियंत्रित करता येतो. २) याचा वापर वारंवार जमिनीतून केल्यामुळे जमिनीतील उपयुक्त सुक्ष्मजीवांची प्रामुख्याने उपयुक्त बुरशीची संख्या वाढते. ३) यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते, खतांची ५०% बचत होते. ४) कमी सुर्यप्रकाशातही यामुळे प्रकाश संश्लेषनाचा दर वाढतो. ५) फवारणीतून याचा वापर केल्यास फळांची प्रत सुधारते. फल्वीक अॅसीड द्रावण केव्हा वापरावे ? हे द्रावण फळभाज्या, पालेभाज्या, फळपिकांसाठी याचा वापर सर्व वाढीच्या अवस्थांमध्ये करता येतो. १) रोप अवस्था २) शाखीय वाढीची अवस्था ३) फुले येण्याची अवस्था ४) फळे येण्याची व पक्वतेची अवस्था फल्वीक अॅसीड किती व कसे वापरावे ? १) पिकाला एकरी १० लिटर फल्वीक अॅसीड द्रावण ड्रिप मधून किंवा पाट पाण्याने द्यावे. २) फवारणी करताना ०.५ ग्रॅम फल्वीक अॅसीड किंवा १० मिली फल्वीक अॅसीड द्रावण प्रती १ लिटर पाण्यात घेवून फवारणी करावी.