ड्रम क्र.७ : इ.एम. दशपार्णी अर्क
आपल्या शेताच्या आजुबाजुला असंख्य वनस्पती आढळतात. या वनस्पतीमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात. काही वनस्पतीचा पाला, फळे अन्नद्रव्यांनी समृध्द असतात. काहीमध्ये बुरशीरोधक, जीवाणूरोधक, किडरोधक गुणधर्म असतो तर काही किडी व रोग परतावणारे ही असतात. याच विविध झाडांच्या पाल्याच्या वापर करुन दशपर्णी अर्क तयार केला जातो.
साहित्य :
इ.एम. २ द्रावण ३७५ लिटर, निंब, करंज, निरगुडी, सिताफळ, टनटनी, शेवगा, पपई, एरंडी, लसूनघास, जांभूळ, तरवड, गुळवेल, कोरफड इ. ची प्रत्येकी ५ किलो पाने, गुळ ५ किलो, ताक ५ लिटर, गोमुत्र ५ लिटर, ड्रम ५०० लिटरचा एअर वॉल असलेला.
कृती :
प्रथम इ.एम. २ द्रावण ३७५ लिटर तयार करा. निंब, कंरज, निरगुडी सिताफळ, टनटनी, शेवगा, पपई, एरंडी, लसुनघास, जांभूळ, तरवड, गुळवेल, कोरफड इ. ची प्रत्येकी २ किलो पाने घेऊन त्याचा ग्राईंडर मशिनच्या साह्याने लगदा (पेस्ट) करा. आले, लसुन, मिरची प्रत्येकी ५ किलोचा ही लगदा (पेस्ट) करा. इ.एम. २ द्रावण ३७५ लिटर मध्ये सर्व लगदा टाका त्यामध्ये गुळ ५ किलो, ताक ५ लिटर, गोमुत्र ५ लिटर टाकुन ड्रम हवाबंद करा. ८ ते १० दिवसात पानामधील अर्क निघतो. पिवळसर, लालसर रंगाचे द्रावण तयार होते या द्रावणाचा सामु ५ येतो. याद्रावणाचा वास आंबट गोड येतो. १० दिवसांनी हे द्रावण वापरण्यायोग्य होते. हे द्रावण एक वर्षापर्यंत वापरता येते.
इ.एम. दशपर्णी अर्काचे फायदे :
१) रोग व किडीचे नियंत्रण करणेसाठी उपयोग होतो.
२) नियमित फवारणी केल्यास हिरवी अळी, केसाळ अळी, तुडतुडे, फलकिडे इ. चा प्रादुर्भाव रोखता येतो.
३) पिकामधील आंतरीक प्रतिकार क्षमता वाढते.
४) अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते.
५) फुलांचे प्रमाण वाढते, फुलगळ थांबते.
६) उत्पादन व प्रत वाढते.
इ.एम. दशपर्णी अर्काचा वापर :
इ.एम. दशपर्णी अर्क सर्व पालेभाज्या, वांगी, भेंडी, टोमॅटो, वाटाणा, बटाटा, कांदा, द्रांक्ष, डाळींब इ. पिकांमध्ये करता येतो. या अर्काची फवारणी पिकाच्या सर्व वाढीच्या अवस्थांमध्ये करता येतो. रोप अवस्था, वाढीची अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, शेंगा/दाणे/फळे येण्याची अवस्था इ.एम. २ द्रावण ५ ते १० मि.ली. प्रती लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी.